You are currently viewing प्रशिक्षण शिबीर भ्रष्टाचार हा तत्कालीन सभापती, सेना पदाधिकारी लक्ष्मण रावराणे यांच्या संगनमताने…

प्रशिक्षण शिबीर भ्रष्टाचार हा तत्कालीन सभापती, सेना पदाधिकारी लक्ष्मण रावराणे यांच्या संगनमताने…

वैभववाडी सभापती सौ. अक्षता डाफळे यांचा आरोप.

वैभववाडी
वैभववाडी पंचायत समिती मधील प्रशिक्षण शिबिरात झालेला भ्रष्टाचार हा तत्कालीन सभापती लक्ष्मण रावराणे यांच्या संगनमताने झाला आहे. त्यामुळे या शिबिर भ्रष्टाचाराची जरूर चौकशी लावावी. व सत्य जनतेसमोर आणावे. असा उपहासात्मक टोला वैभववाडी पं.स.सभापती अक्षता डाफळे यांनी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांना प्रसिद्धी पत्रकातून लगावला आहे.
शुक्रवारी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी वैभववाडीतील प्रशिक्षण शिबिर भ्रष्टाचाराबाबत पालकमंत्र्यांचे लक्ष वेधणार व सखोल चौकशीची मागणी करणार असल्याची प्रतिक्रिया दिली होती. यावर अक्षता डाफळे यांनी सावंत यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रशिक्षण शिबिराच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश त्यांनी जरूर करावा. सदर शिबिर 15 व 16 नोव्हेंबर 2019 या कालावधीत झाले आहे. दरम्यान यावेळी सभापती लक्ष्मण रावराणे हेच होते. त्यांच्याच कालावधीत सदर शिबिर पार पडले. इतरही अनेक प्रशिक्षणे त्यांच्या कालावधीत झाली आहेत. आतापर्यंत जो काही भ्रष्टाचार झालेला आहे तो लक्ष्मण रावराणे यांच्या संगनमताने झाला आहे. त्यामुळे त्यांच्या कारकिर्दीतील सर्वच प्रशिक्षण शिबिरांची चौकशी सतीश सावंत यांनी करावी पालकमंत्र्यांचे लक्ष जरूर वेधावे असे पत्रकात डाफळे यांनी म्हटले आहे. जे सेना नेत्यांच्या बरोबर काम करत आहेत. त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत. ते सेना पदाधिकारी लक्ष्मण रावराणे यांच्या अकार्यक्षम कार्यपद्धतीमुळे आज तालुक्यावर ही वेळ आल्याचे पत्रकात सौ. डाफळे यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − 7 =