You are currently viewing संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छ्ता अभियानात परुळेबाजार ग्रामपंचायत जिल्ह्यात प्रथम

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छ्ता अभियानात परुळेबाजार ग्रामपंचायत जिल्ह्यात प्रथम

ओरोस

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन 2021-22 अंतर्गत परुळेबाजार ग्रामपंचायतीने जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. निरवडे ग्राप ने द्वितीय तर खांबाळे ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक पटकावला आहे. या तीनही ग्रा प ना अनुक्रमे ५ लाख, ३ लाख आणि २ लाख रुपये पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. दरम्यान परुळेबाजार आणि निरवडे या दोन ग्रामपंचायतींची विभाग स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात राबविण्यात आले होते. त्यातून ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात स्वच्छ वार्ड जाहिर जाहीर करण्यात आले असून त्यांना दहा हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. या ग्रामपंचायती मधुन तालुकास्तरावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेअंतर्गत तपासणी करुन जिल्हा परिषद प्रभागातील एका ग्रामपंचायतीची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेकरीता करण्यात आली होती. तालुकास्तरावर जिल्हा परिषद प्रभागात असणा-या स्वच्छ ग्रामपंचायतीला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान 2021- 22 अंतर्गत पन्नास हजार रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.

तालुकास्तरावरुन जिल्हा परिषद प्रभागनिहाय जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या 50 ग्रामपंचायतीची जिल्हास्तरिय समितीने तपासणी केली होती. यामध्ये वेंगुर्ले तालुक्यातील गपरुळेबाजार ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांकाचे 5 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर झाले आहे. व्दितिय क्रमांक सावंतवाडी तालुक्यातील निरवडे ग्रामपंचायतीला मिळाला असून ३ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर झाले आहे. तर वैभववाडी तालुक्यातील खांबाळेग्रामपंचायतीला तृतीय क्रमंकाचे 2 लाख रुपयांचे परितोषिक जाहीर झाले आहे. अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी पराजित नायर आणि स्वच्छ्ता व पाणी विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen + 2 =