You are currently viewing इंधन दरवाढ विरोधात रिक्षा संघटनेचे १ रोजी  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

इंधन दरवाढ विरोधात रिक्षा संघटनेचे १ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

ओरोस

सी .एन. जी. गॅस, पेट्रोल, डिझेल या इंधनाच्या भरमसाठ दरवाढी विरोधात १ ऑगस्ट रोजी रिक्षा, टॅक्सी बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय आज रवळनाथ मंदिर ओरोस येथे झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा चालक मालक संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला. तशाप्रकरचे निवेदन जिल्हा प्रशासन व आरटीओ यांना संघटनेच्यावतीने देण्यात आले आहे.

पेट्रोल, डिझेल, सी.एन.जी. दरवाढ व महागाईने उच्चांक गाठला आहे. कधी नाही एवढे रिक्षा, टॅक्सी चालक अडचणीत आले असून ते बेजार झालेले आहेत. महाराष्ट्र शासन व परिवहन प्रशासन दरबारी रिक्षा टॅक्सी चालकांचे गेली अनेक वर्षांपासूनचे ज्वलंत प्रश्न, न्याय मागण्या, भाडे दरवाढ प्रलंबित आहेत. दरवेळेस रिक्षा टॅक्सी चालक, कष्टकरी यांच्या न्याय मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे अशी भावना तमाम कष्टकरी, रिक्षा टॅक्सी बांधवांची झालेली आहे. या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी १ ऑगस्ट २०२२ रोजी रिक्षा टॅक्सी बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, असे देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याविषयी आज श्री रवळनाथ मंदिर ओरोस येथे सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा चालक मालक संघटनेची बैठक पार पडली. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा परिवहन कार्यालय ओरोस येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन पोलांडे यांच्याशी चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हा अध्यक्ष संजय शारबीद्रे, जिल्हा सचिव सुधीर पराडकर, खजिनदार राजन घाडी, उपाध्यक्ष नागेश ओरोसकर, माजी अध्यक्ष मामा ओरोसकर, कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ कार्याध्यक्ष संतोष नाईक आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 + four =