You are currently viewing इन्सुलीच्या गजेंद्र कोठावळे यांना आर्ट बिट्स फाऊंडेशनचा महाराष्ट्र युवा कला गौरव पुरस्कार जाहीर..

इन्सुलीच्या गजेंद्र कोठावळे यांना आर्ट बिट्स फाऊंडेशनचा महाराष्ट्र युवा कला गौरव पुरस्कार जाहीर..

सावंतवाडी

आर्ट बिट्स फाऊंडेशन पुणेकडुन युवा कलाकारांना प्रोत्साहन महाराष्ट्र युवा कला गौरव पुरस्कार देण्यात येतो.सावंतवाडी-इन्सुली येथील कलाकार गजेंद्र कोठावळे यांना अभिनय या कला विभागात हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला.एकुण सहा कला विभागात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.आर्ट बिट्स ही संस्था गेली एकवीस वर्षे सातत्याने चित्र,शिल्प,संगीत,अभिनय,नृत्य आणि लोककला अशा सर्वच कला विभागातील कलाक्षेत्रातील कलाकारांना सक्षम व्यासपीठ व प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने काम करीत असते.

गजेंद्र कोठावळे यांना हा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे इन्सुली पंचक्रोशीतुन त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा