You are currently viewing जुगाराची नवी बैठक खुद्द कणकवलीत…

जुगाराची नवी बैठक खुद्द कणकवलीत…

जिल्ह्यात अवैद्य धंद्यांवर जेवढ्या कारवाया होतात तेवढेच अवैद्य धंदेवाले नवनवीन क्लुप्त्या वापरत नवीन जागा शोधून जुगाराच्या बैठका बसतात. अलीकडेच मिडियामधून अवैद्य धंद्यांच्या विरोधात आवाज उठविला गेल्याने जुगाराच्या जिल्ह्यातील बैठका उध्वस्त होत आहेत. बऱ्याच ठिकाणी पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली आहे. परंतु पोलिसांकडून केलेल्या कारवाईत क्वचित प्रसंगी जुगारी पकडले गेले आहेत, तर जाग्यावर फक्त मुद्देमाल मिळतो, पैसे उचलले जातात, त्यातील काही रक्कम दाखविली जाते आणि जुगारातील आरोपी मात्र पळवून लावतात किंबहुना पळायला लावतात. या पळवापळवी मध्ये अनेकांचे गुडघे सुद्धा फुटले आहेत. पण पळायला मिळाल्यामुळे जुगाऱ्यांना दुसऱ्या ठिकाणी अड्डा बनवायला मार्ग भेटतो. जर अवैद्य धंद्यांचे कंबरडे मोडायचे असेल तर मुख्य तकशीम असणाऱ्या जुगाऱ्यांना अटक होऊन त्यांच्याविरुद्ध कारवाई होणे आवश्यक आहे.
आज खुद्द कणकवली शहरात एका बंदिस्त हॉटेलमध्ये जुगाराची बैठक होत असून त्यात जिल्ह्यात जुगारी म्हणून ओळख असणाऱ्या मोठ्या राजकीय हस्ती सुद्धा सहभागी आहेत. फोंडा येथील पिळून काढलेला विठ्ठल नामाचा जप करणारा मोठा जुगारी व कणकवलीतील टिंगल कॉन्टेरो हे पारावरच्या माणसांसोबत संध्याकाळी ४.०० वाजता बैठकीस बसले असून रात्री उशिरा १०.०० वाजेपर्यंत बैठक सुरू राहण्याची गुप्त माहिती मिळाली आहे.
फोंडा येथील पिळून काढलेला अट्टल जुगारी विठ्ठल नामाचा जप करत सकाळी फोंडा येथे जुगाराची बैठक बसवतो व संध्याकाळी चार वाजता कणकवलीत वेगवेगळ्या ठिकाणी जागा बदलून बैठका बसवत असतो. यात पारावरचे राजकारणी देखील सामील असतात. काल संध्याकाळी ५.०० वाजता हाच फोंडयाच्या पिळून काढलेला विठ्ठल नामाचा जप करणारा जुगारी आणि कणकवलीतील टिंगल कॉन्टेरो गोवा हद्दीजवळ पत्रादेवी येथे बैठक बसविण्यासाठी नव्या जागेच्या शोधात गेले होते. तिथे अक्षय नावाच्या व्यक्तीसोबत बैठकीबाबत भेट घेतली आहे. त्यामुळे पुढील जुगाराचा अड्डा पत्रादेवी येथेही हलला तर आश्चर्य वाटायला नको.
कणकवलीतील टिंगल कॉन्टेरो हा जुगारी तळेरे येथे सुद्धा जुगाराचा क्लब सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे. वरून आशीर्वाद मिळाल्यास तळेरे येथे जुगाराचा क्लब सुद्धा सुरू करणार आहे. जिल्ह्यात विकास खुंटलेला आहे, कोरोनाचे संकट उभे ठाकलेले आहे, परंतु अवैध्य धंदे सुरू असल्याने जुगारासारख्या बैठकांमधून तासनतास एकत्र बसल्याने जिल्ह्यात कोविडचे रुग्ण वाढण्यास मदत होते. फणसगाव येथे बसलेल्या बैठकीत सुद्धा अनेक जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून आले होते.
जिल्ह्यात वाढत असलेले जुगार, दारू, मटक्यासारखे अवैद्य धंदे चिंतेचा विषय बनत असून त्यातून पर्यटन जिल्ह्याची शान वाढण्यापेक्षा बदनामीच जास्त होत आहे. जिल्हा पोलिस प्रशासनाने गांभीर्याने विचार करून अवैध्य धंद्यांवर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty + nineteen =