You are currently viewing कु.स्वप्नाली ला आम.नितेश राणे यांनी केली ५० हजाराची मदत
डोंगरात झोपडीत बसून ऑनलाईन अभ्यास करणाऱ्या कु.स्वप्नाली ला आम.नितेश राणे यांनी केली ५० हजाराची मदत

कु.स्वप्नाली ला आम.नितेश राणे यांनी केली ५० हजाराची मदत

डोंगरात झोपडीत बसून ऑनलाईन अभ्यास करणाऱ्या कु.स्वप्नाली ला आम.नितेश राणे यांनी केली ५० हजाराची मदत
कु.स्वप्नाली ला या मदतीमुळे मुंबईत हॉस्टेल मध्ये राहून घेता येणार दर्जेदार शिक्षण
कणकवली प्रातिनिधी:
गावात इंटरनेट नाही मात्र पशुवैद्यकीय पदवीचा ऑनलाईन अभ्यास डोंगरात झोपडीत बसून करणाऱ्या कणकवली तालुक्यातील दारीस्ते येथील कु.स्वप्नाली सुतार हिच्या जिद्दीची दखल आमदार नितेश राणे यांनी घेतली आहे. कु.स्वप्नाली हिला शिक्षणासाठी आमदार नितेश राणे यांनीं पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे. ही रक्कम कु.स्वप्नाली हिच्या बँक खात्यात जमा केली आहे. त्याच प्रमाणे संपूर्ण शिक्षण होईपर्यंत जी मदत लागेल ती आपण करणार असल्याचे आश्वासन आम.राणे यांनी दिले आहे. मुंबईत शिकत असलेल्या कॉलेजच्या परिसरात हॉस्टेल मध्ये राहण्यासाठी आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने कु.स्वप्नालीच्या शिक्षणाची होणारी परवड आम.नितेश राणे यांच्या मदतीमुळे थांबणार आहे. या पुढे तिला मुंबईतच राहून शिकता येणार आहे.
कु.स्वप्नाली सुतार ही दारीस्ते येथील आपल्या गावी राहून ऑनलाईन अभ्यासाठी डोंगरावर जाऊन एका झोपडीत बसून दिवस दिवस अभ्यास करत असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल आम.नितेश राणे यांनी घेऊन कु.स्वप्नाली हिला संपर्क साधला होता. तिला भेडसावणाऱ्या समस्यांची सहानुभूतीपूर्वक चौकशी केली होती. पशुवैद्यकीय पदवीसाठी ऑनलाईन अभ्यास, आवश्यक पुस्तकांसाठी वाचनालयाची असलेली गरज आदी सुविधा मुंबईत पूर्ण होऊ शकतात त्यासाठी हॉस्टेल मध्ये राहण्याची गरज होती. ही गरज आमदार नितेश राणे यांनी ओळखून कॉलेज परिसरातील हॉस्टेल मध्ये राहण्यासाठी येणाऱ्या खर्चाचे पन्नास हजार रुपये बँक खात्यात जमा केले आहेत. या मदती बद्दल कु.स्वप्नाली हिच्या नातेवाईकांनी आम.राणे यांचे आभार मानले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − 14 =