You are currently viewing धुंद आसमंत

धुंद आसमंत

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या डॉ. प्रतिभा हरणखेडकर लिखीत अप्रतिम काव्यरचना*

*धुंद आसमंत*

निळे नभ काळे ढग
सभोवती ओलेती हवा
हिरवा निसर्ग नटलेला
धुंद बहरलेला मारवा

गिरी डोंगर हिरवेगार
खळाळत वाहे पाणी धार
गोड मधूर रूचिर पाणी
किती मानू निसर्गाचे आभार

कुठे दांडगे उड्या मारीत
धबधबा उंचावरून आदळे
थंडगा‌र दुधाळ फेसाळत
अहा धबधबा तोय उसळे

सोनचाफा, सुगंधी मोगरा
जाई जुई चमेलीच्या वेली
हिरव्या देठी उभा निशीगंध
कुठे खुणावे मुग्ध अबोली

प्राची उधळी रंग बावरे
नभांगणात मुक्त लोळवी
चुकार सोनकिरण रवीचा
नूतन कलिकेस खेळवी

लपंडाव चंदेरी धारांचा
मधेच चमके तारा नभिचा
रंगीत झोपाळा टांगला
आकाशाने इंद्रधनुचा

किलबील किलबील
मधू पक्षी बोलती मजेत
विहार करिती आसमंती
गिरकी नी वेलांटी घेत

डोंगर दरितून लपत
शीळ घालीत वाहे वारा
खुरे उधळीत वनी बागडत
गुरे वासरे आस्वादती चारा

घागर घेउनी डोई कटीवर
अवखळ तरुणी अन् बाला
मंद धुंद आसमंत सारा
पदरी त्यांच्या घाली घाला

डॉ. प्रतिभा हरणखेडकर
जळगाव

प्रतिक्रिया व्यक्त करा