You are currently viewing दीप

दीप

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक, कवी, गीतकार, संगीतकार, गायक श्री.अरुण गांगल यांची अप्रतिम काव्यरचना*

*दीप अमावस्येच्या सर्वांना शुभेच्छा!*

*”दीप”*

ज्ञानदीप लावू या जगात
अज्ञानाचे तिमिर जावोत।।ध्रु।।

प्रेम ज्ञान देत दीपज्योत
त्याग एकाग्रता शिकवीत
सद्गुण अविचल रहात।।1।।

प्रकाश अंधार ना पहात
सूर्याला रात्र ना दिसत
चैतन्य देई दीप सतत।।2।।

उंबर्‍यावर दीप ठेवूया तेवत
उजेड पडेल बाहेर आंत
मिळे वैराग्य शुद्धता सुखद।।3।।

लावतात दीप सर्व कार्यांत
तमोगुण विक्षेप जाळीत
प्रज्वलन हवा करीत शुद्ध।।4।।

काव्य:श्री अरुण गांगल.कर्जत रायगड.महाराष्ट्र.
पिन.410201.
Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा