जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी जयराम धोंगडे यांनी अप्रतिम गझल रचना
कुठे काय आहे बरे माणसाचे?
मला तर दिसेना खरे माणसाचे!
किती स्वैर झाला कसे आवरावे?
नको सैल ते कासरे माणसाचे!
मना वाटते घोर चिंता तयाची,
निखारे जणू आसरे माणसाचे!
दिसाया बरे जे बरे वागती का?
कसे ओळखू चेहरे माणसाचे?
जसा हा तसा तो निराळे न काही,
खरे वाटती सोयरे माणसाचे!
जयराम धोंगडे, नांदेड