You are currently viewing मुंबई, ठाणे येथील सर्वसामान्य नागरिक श्री.प्रशांत खानविलकर यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांकडे पत्र लिहून ठाणे घोडबंदर रोड वरील ट्रॅफिक बाबत केली तक्रार

मुंबई, ठाणे येथील सर्वसामान्य नागरिक श्री.प्रशांत खानविलकर यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांकडे पत्र लिहून ठाणे घोडबंदर रोड वरील ट्रॅफिक बाबत केली तक्रार

 

जय महाराष्ट्र,
मा. मुख्यमंत्री,
महोदय एकनाथजी शिंदे साहेब.
महाराष्ट्र,(ठाणे )

महोदय,
मा.शिंदे साहेब मी एक सर्व सामान्य नागरिक आहे जो आपल्या सारखे नेत्यांना मतदान करत आलो आहे आणि आम्हाला आनंद आहे आपण ठाणे जिल्ह्याचे विद्यमान आमदार आहातच त्याशिवाय महाराष्ट्राचे (मुख्यमंत्री ) पालक म्हणून जबाबदारी पाहत आहात.

मुख्यमंत्री महोदय आपण मुख्यमंत्री झाल्यापासून दिल्ली पर्यंत पोहचलात किंबहुना महाराष्ट्रात जेवढा वेळ आपण देऊ शकला नाही आहात त्यापेक्षा जास्त वेळ आपण दिल्लीत देत आहात,महाराष्ट्र मधील ठाणे जिल्ह्यातून आपण निवडून आला आहात तर ठाणे जिल्ह्याची परिस्थिती कदाचित आपण पाहिली नसावी आणि जर पाहिली असेल तर…..

महोदय गेले महिनाभर ठाणे जिल्ह्यात नेहमी ट्राफिक इतकी होत आहे की त्यावर लक्ष द्यायला सुद्धा कोणालाही वेळ नाही,घोडबंदर रोड,माजीवडा – नाशिक रोड, कळवा – ठाणे,ठाणे – मुंबई,ठाणे -LBS, कळवा – नवी मुंबई रोड,या सर्व रस्त्यावर ज्या ठिकाणी ०५ – १० मिनिटा मध्ये पोहचायला पाहिजे त्या ठिकाणी सर्व सामान्य नागरिकांना पोहचायला कमीत-कमी ०१.३० ते ०३.०० तास लागत आहेत किंबहूना त्याहून सुद्धा जास्त वेळ लागत आहे. कोणाला कामाला जायला उशीर होत आहे त्यामुळे कामावर सर्वाना वरिष्ठ लोकांचे ऐकावे लागत आहे,काहींचा पगार कमी केला जात आहे आणि काहींना तर कामावरून काढण्याची धमकी सुद्धा दिली जाते कदाचित काढलेही असेल तसेच विद्यार्थी सुद्धा शाळेंमध्ये अव्वाच्या सव्वा फी भरत आहेत पण एवढ करून सुद्धा विद्यार्थी शाळेत वेळेवर पोहचू शकत नाही आहेत,विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे,पेट्रोल – डिझेल- सिनजी ची किंमत गगनाला भिडत आहे या ट्राफिक मध्ये त्याचा वापर विना फायद्याचा होत आहे.या सर्व बाबींचा विचार केला तर सर्व सामान्य जनतेच काय चुकलं की सर्व सामान्य जनतेच्या नशिबात हालच येणार??आधीच कोरोना सारख्या महामारीमुळे लोकांच्या नोकऱ्या गेल्या,कुटुंब उध्वस्त झाली आहेत याचा विचार आपण करायलाच पाहिजे.

महोदय आपण स्वतः रस्त्यावर उतरून बघा रस्त्यावरील लांबच-लांब ट्राफिक कशामुळे होत आहे आणि यावर उपाय म्हणून सरकार काय करू शकते याबद्दल तातडीने निर्णय घ्यावा आणि सर्व सामान्य जनतेच्या फायद्याचे महत्वाचे निर्णय घ्यावेत ही विनंती.

आपलाच,
एक सामान्य नागरिक,
प्रशांत खानविलकर,
महाराष्ट्र.

प्रतिक्रिया व्यक्त करा