You are currently viewing “हर घर तिरंगा” अंतर्गत शहरातील प्रत्येक घरात तिरंगा झेंडा नगरपंचायत देणार!

“हर घर तिरंगा” अंतर्गत शहरातील प्रत्येक घरात तिरंगा झेंडा नगरपंचायत देणार!

नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती

कणकवली

स्वतंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त शासनामार्फत हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक नागरिकांनी 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत आपल्या घरासमोर तिरंगा झेंडा फडकवायचा आहे. कणकवली नगरपंचायत च्या वतीने देखील या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. कणकवली नगरपंचायत च्या वतीने कणकवली शहरातील प्रत्येक घरनिहाय तिरंगा झेंडा मोफत देण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. कणकवली नगरपंचायत च्या माध्यमातून हरघर तिरंगा या उपक्रमाचे नुकतेच नियोजन पूर्ण करण्यात आले. या उपक्रमांतर्गत शहरातील प्रत्येक नागरिकांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करावा असे आवाहन नगराध्यक्ष श्री नलावडे यांनी केले. कणकवली शहरातील प्रत्येक घर, शाळा यांना झेंडा मोफत देण्यात येणार आहे. जेणेकरून प्रत्येक शहरवासीयांनी या उपक्रमात सहभागी व्हावे हा यामागील हेतू आहे. त्यामुळे जनतेने या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four − 1 =