You are currently viewing ठाकरे आणि शिदे गटाचे कार्यकर्ते कणकवलीत भिडले, ठाकरे गटाच्या एका पदाधिकाऱ्याला मारहाण

ठाकरे आणि शिदे गटाचे कार्यकर्ते कणकवलीत भिडले, ठाकरे गटाच्या एका पदाधिकाऱ्याला मारहाण

ठाकरे आणि शिदे गटाचे कार्यकर्ते कणकवलीत भिडले, ठाकरे गटाच्या एका पदाधिकाऱ्याला मारहाण

कणकवली:

शिवसेनेचे ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील कार्यकर्त्यांमध्ये कणकवली नरडवेनाका येथे चांगलीच जुंपली. येथीलच वैभव बारच्या समोर शिवसेनेच्या ठाकरे गटातील दोन पदाधिकारी आणि शिंदे गटातील उदय सामंत यांना भेटण्यास गेलेले पदाधिकारी एका दुसऱ्यासमोर आले. यावेळी शाब्दिक वाद झाला, त्यानंतर शिंदे गटातील तीन जणांनी मिळून ठाकरे गटाच्या एका कार्यकर्त्याला बेदम चोप दिला. ही घटना आज मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली.
कणकवली तालुक्यात ठाकरे विरुद्ध शिंदे गट नुकतेच होऊ लागले आहेत त्यातील उदय सामंत यांना भेटण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात काही पदाधिकारी गेले होते हे पदाधिकारी आज शिवसेना शाखेच्या बाहेरील बाजूस वैभव वैभव बियरबार नजीक ठाकरे गटाच्या दोन पदाधिकाऱ्यांना समोरासमोर आले.यावेळी शाब्दिक टोमणेबाजी झाली.त्यानंतर शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक होत थेट ठाकरे गटातील एका कार्यकर्त्याला चोप दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 − one =