सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध
कणकवली तालुक्यातील कळसुली जिल्हा परिषद दिंडवणे केंद्र शाळा केंद्र नं. 2 च्या शाळकरी विद्यार्थ्यांना भल्या मोठ्या खड्ड्यातून मार्ग काढत गाटावी लागतेय शाळा, याकडे सा. बां. विभागाचा मात्र दुर्लक्ष झालेला होता. सा. बां. विभागाला जाग येण्यासाठी आज राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्तेंसह ग्रामस्थ एकत्र येत रस्त्यावरील खड्ड्यात वृृक्षारोपण करून सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध करण्यात आला.
दिंडवणेवाडी ते आंब्रड फाटा जवळपास 2 कि. मी. रस्त्यावर जीव घेणे खड्डे पडले आहेत. पावसात खड्ड्यांमध्ये पाणी असल्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना चिखल तुडवत शाळा गाठावी लागते. तसेच नवक्या वाहन चालकांना अंदाज न आल्याने शाळकरी विद्यार्थ्यांवर चिखलाचे पाणी अंगावर उडत असते. हा रस्ता कळसुली गावातून देंदोंनेवाडी प्रकल्पग्रस्तांकडे जोडणारा हा मार्ग आहे. या रस्त्यावर मोठी वर्दळ असते. गणेश चतुर्थीच्या पूर्वी खड्डे न भूजवल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनकडून आंदोलनाचा इशारा केला आहे.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर चव्हाण, राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष ॲड भरत घाडीगावकर, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस रुजाय फर्नांडीस, कुष्णा घाडीगावकर, तातू गावकर, सुहास घाडीगावकर, कृष्णा तावडे,तावडे, बाबू आंब्रडकर, काका कदम, ॲड गौतमी घाडीगावकर, सह शाळकरी विद्यार्थी व पालक उपस्थित होते.