You are currently viewing मसुरे येथील मिहीर शैलेश मसुरकर या सात वर्षाच्या बालकाचा प्रामाणिकपणा..

मसुरे येथील मिहीर शैलेश मसुरकर या सात वर्षाच्या बालकाचा प्रामाणिकपणा..

रस्त्यात मिळालेले पैसे प्रामाणिकपणे केले परत…

 

मालवण (मसुरे) :

सर्वत्र माणुसकी आज लुप्त होत आहे. सर्वत्र पैशासाठी माणसे आज आपले विचार आणि प्रामाणिकता बाजारात विकत असताना मात्र मसुरे बाजारपेठ येथील सात वर्षाच्या एका बालकाने मात्र प्रामाणिक पणाचे एक मूर्तीमंत उदाहरण आज सर्वांसमोर ठेवले आहे. या छोट्या बालकाचे नाव मिहीर शैलेश मसुरकर असून मसुरे केंद्र शाळा येथे इयत्ता दुसरी मध्ये तो शिकत आहे.त्याला रस्त्यात मिळालेले बाराशे रुपये त्याने परत करून सर्वांसमोर एक आदर्श ठेवला आहे.

रविवारी संध्याकाळी मसुरे मर्डे बाजारपेठ येथे आपल्या मोठ्या बहिणी कडे जात असताना रस्त्यामध्ये पडलेले बाराशे रुपये त्याला मिळाले. प्रामाणिकपणे ते सर्व पैसे तेथीलच नाचणकर काकांकडे देऊन त्यांना रस्त्यावर पडलेले हे पैसे मला मिळाले असून ज्याचे असतील त्यांना तुम्ही परत द्या असे या बालकाने सांगितले. यानंतर नाचणकर काकांनी या पडलेल्या पैशाचा शोध घेता तेथील राहुल शिवाजी परब या युवकाला त्याचे पैसे पुन्हा परत दिले. मिहीर हा मसुरे केंद्र शाळा येथे शिकत असून प्रशालेतच त्याला त्याच्या शिक्षकांकडून आणि आई-वडिलांकडून प्रामाणिकपणाचे धडे मिळाले होते. त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल त्याला बक्षीस स्वरूपात देऊ केलेली रक्कम सुद्धा त्याने मोठ्या मनाने नाकारली.

मीहीर मसुरकर याच्या प्रामाणिक पणाबद्दल सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − six =