You are currently viewing भाव मनीचे छेडीता

भाव मनीचे छेडीता

बुलढाणा जिल्हा दक्षता समिती अध्यक्ष तथा भाग्योदय साहित्य संच उजैनकर फाउंडेशनचे सदस्य लेखक कवी मनोहर पवार लिखित अप्रतिम काव्यरचना

प्रिय …
जेव्हा तू…
यायचीस माझ्या समोर..
तेव्हा मी नजरेला नजर..
देतांना….
व्हायचो पुरता घायाळ ….

तुझ्या नजरेची भाषा
मला कळायची….
पण.. न बोलताही तू
….. सारं काही आलबेल
असल्याची मनातले….
सांगायची.. मनकवडीच तू……..

प्रिये तुझ्या त्या गर्द गहिऱ्या
….. अथांग डोळ्यात तू…
साठवलस माझे रांगडं रुपडं
तेव्हा पासून मी…
….. टक लावूनच बघतोय तुझ्याकडे….. मोठ्या धाडसाने .. डोळ्यात साठविण्यासाठी .

आपले मौन असले … तरीही
तुझ्या डोळ्यांची … भाषा….. झिरपते … अगदी
अगदी ………. खोलवर….

म्हणुनच प्रिय …
भाव मनीचे ओळखू
अन् …. निसंग व्होवून.. हृदयाला हात घालून
बिलगूया देहास या…
ते मौन…. बोलके … करण्यासाठी .

मनोहर पवार
मुक्ताई नगर, जळगाव

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 1 =