पुणे
नक्षञाचं देणं काव्यमंच,मुख्यालय,पुणे ३९ वतीने लावणी थिएटरला आली आणि तिला प्रतिष्ठा मिळाली.त्याप्रमाणे कविता थिएटरला आणुन तिला प्रतिष्ठा मिळण्यासाठी “काव्यातील नक्षञ..काव्यवाचन आविष्कार” बोल्ड कवींची,स्मार्ट काव्यमैफल या थिएटर शो चे आयोजन एस.एम.जोशी सभागृह पुणे येथे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.प्रेम आणि पाऊस या विषयांवरील विविध कवितांचा आविष्कार संपूर्ण महाराष्टातून उपस्थित कवी कवयिञींनी सादर केला.
या कार्यक्रमाचे शो उदघाटक वसंत आत्माराम टाकळे(प्रभारी उप कार्यकारी अभियंञा राष्टीय महामार्ग विभाग,रत्नागिरी),ज्येष्ठ विनोदी कवी,नकलाकार बंडा जोशी,युवा उद्योजक शुभम सोनवणे,सौ.वृषाली टाकळे,प्रा.राजेंद्र सोनवणे (राष्टीय अध्यक्ष-नक्षञाचं देणं काव्यमंच),यशवंत घोडे,डाॅ.अलका नाईक,डाॅ.माधुरी बागुल,दिनेश चव्हाण,रामचंद्र पंडीत,मंदाताई वाघमारे इ.मान्यवर उपस्थित होते.
वृक्षाचे पूजन करुन व वृक्षाला पाणी घालुन पर्यावरण संदेश देत आगळ्या वेगळ्या पध्दतीने उदघाटन सोहळा वसंत टाकळे यांच्या शुभहस्ते दुस-या थिएटर शो चे उदघाटन झाले.
या प्रसंगी वसंत टाकळे म्हणाले की,”कवितेला आणि कवीला प्रतिष्ठा मिळवुन देण्यासाठी नक्षञाचं देणं काव्यमंच गेली २२ वर्षांपासुन विविध काव्य उपक्रम राबवत आहे.कवीला समाजाने जपले पाहीजे.विविध स्तरातुन अशा उपक्रमांतुन साहित्यिक,काव्य ऊर्जा बाहेर येत असते.थिएटरला कवितेला आणण्याचा अभिनव ओलेचिंब अनोखी काव्यमैफल ही एका नव्या पिढीची काव्यातील नांदी आहे.”
या प्रेम व पाऊस विषयावरील विविध भाव छटा आपल्या काव्यातुन रसिकांपुढे सादर केल्या.त्यात सहभागी कवी कवयिञी मध्ये डाॅ.माधुरी बागुल (नाशिक),सौ.वृषाली टाकळे(रत्नागिरी),यशवंत घोडे (जुन्नर),डाॅ.लक्ष्मण हेबांडे(डोंगरगाव),रामचंद्र पंडीत(सातारा),दिनेश चव्हाण(चाळीसगाव),डाॅ.अलका नाईक(मुंबई),प्रा.नरेंद्र पोतदार (गोंदिया),प्रा.प्रकाश पाटील(जळगाव),मंदाताई वाघमारे(यवतमाळ),शोभा जोशी (चिंचवड),सौ.दिव्या भोसले(दिघी),अशोक सोनवणे (चिंचवड),सुनिल बिराजदार(सोलापूर),राम जाधव(बुलढाणा),रुपाली भालेराव(आकुर्डी),सौ.वसुधा नाईक(पुणे),पियुष काळे (आळे),सुनिल गायकवाड(खानदेश),सुरेश सकटे (कोल्हापुर),शाहिस्ता खान(यवतमाळ) इ.सुप्रसिदध कवी कवयिञींनी सहभाग घेतला.
सहभागी कवी कवयिञींना सन्मानचिन्ह,गौरवपञ,गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.राजेंद्र सोनवणे,कार्यक्रमाचे उदघाटक वसंत टाकळे यांनी केले.कार्यक्रमाचे सूञसंचालन सौ.रुपा भालेराव यांनी केले.आभारप्रदर्शन युवा उद्योजक मोहन कुदळे यांनी मानले.सलग साडेतीन तास ही काव्यमैफल बहारदारपणे रंगली.
वसुधा नाईक,पुणे