You are currently viewing डेगवे येथील श्री स्थापेश्वर, महालक्ष्मी दिनदर्शिकेचे प्रकाशन…!

डेगवे येथील श्री स्थापेश्वर, महालक्ष्मी दिनदर्शिकेचे प्रकाशन…!

बांदा

सावंतवाडी तालुक्यातील डेगवे गावच्या श्री माऊली पंचायतन देवतांची आज देवदिवाळीचे औचित्य साधून सकाळी दुग्धाभिषेक केला. त्यानंतर विधिवत पुजा केली.देवीला नववस्त्र परीधान केले. विविध अंलकार परीधान केल्या नंतर श्री माऊली देवीची खणा, नारळाने गावातील सुहासिनी यांनी ओटी भरली. त्यानंतर गावातील भाविकांनी दर्शन घेतले आहे.
श्री माऊलीची उद्या बुधवार दि.१६.१२.२०२० रोजी वार्षिक जत्रोत्सव आहे. त्यामुळे आज गावरहाटीने ४८खेड्याचा अधिपती असलेल्या “श्री स्थापेश्वर,महालक्ष्मी दिनदर्शिका२०२१”चे गावातील ग्रामस्थांच्या हस्ते सकाळी उद्घाटन केले आहे. सदर दिनदर्शिका गेली ११वर्षे जाहिरात दार, व भाविकांच्या सहकार्याने काढले जाते. सदर दिनदर्शिकेच्या व विक्रीच्या माध्यमातून जमा झालेली देणगीचा उपयोग श्री स्थापेश्वर मंदिराच्या बांधकामकरीता वापरला जातो आहे.तरी भाविकांनी सहकार्य करावे अशी विनंती आहे.

उल्हासदेसाई,
सरचिटणीस,
डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघ,मुंबई

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 + 4 =