*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री संजना जुवाटकर लिखित अप्रतिम वृत्तबद्ध काव्यरचना*
*वनहरिणी* ८/८/८/८
वरवर दिसले सुंदर सारे, कुरुप कधीही दिसले नाही
मनात होते काळे त्याच्या, मला कधी का कळले नाही
नाजुक, मोहक कळी कोवळी, वाऱ्यासंगे उमलत जाते
विनाशकारी येता वारा, फुलास जगणे जमले नाही
का ठेवावा विश्वास तरी, एखाद्याच्या वक्तव्यावर
फिरता मागे दोन पावले, कटू बोलणे पटले नाही
दुःख सदाही झेलत भाळी, आयुष्याला ढकलत जगते
फुलांसारखे हसू मोकळे, नशिबात तिच्या उरले नाही
मनात नसता किती गायची, उसनी महती एखाद्याची
खोटे खोटे गोड बोलणे, मनास माझ्या रुचले नाही
सौ. संजना विद्याधर जुवाटकर
कळवा, ठाणे.