You are currently viewing वनहरिणी वृत्त

वनहरिणी वृत्त

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

*वनहरिणी वृत्त*
*”निवडणुकीचे आले वारे”*

नकली नोटा चलनामध्ये, दिवसा कोणा दिसले तारे
सांभाळूनी रहा मित्रहो, निवडणुकीचे आले वारे

नव्या घोषणा पोकळ बाता, विकास करुया पुढच्या वेळी
संधी अजुनी ज्यास पाहिजे, देई नोटा गाजर केळी

टिव्हीवरूनी अधुनीमधुनी, झळकु लागली विकासकामे
आधार जणू एकच उरला, मते मागती त्याच्या नामे

टाहो फोडुन मेली जनता, दाद दिली ना कुणी ऐकले
रातोराती खड्डे भरले, रस्त्यांवरती डांबर निजले

गल्लोगल्ली लाल दिव्याच्या, गाड्या दिसती गरगरताना,
बिन बोलवता नेते मंत्री, दौऱ्यावरती बघ फिरताना

रेशनवरती राशनच नव्हे, वाटप झाल्या साड्या सुद्धा
विसरेल कसा मतदार अता, महागाइ हा ज्वलंत मुद्दा?

घाईमध्ये उद्घाटन अन् निधीचाच मग नसतो पत्ता
खोटे खोटे बोल बोलुनी येईल तरी कशी सुबत्ता..?

©दीपक पटेकर (दीपी)
सावंतवाडी
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा