तळेरे : प्रतिनीधी
५६ वी महाराष्ट्र राज्य वरिष्ठ अजिंक्यपद आणि आंतरजिल्हा कॅरम स्पर्धा मुंबई, विरार येथे दि १३ ते १६ ऑगस्ट २०२२ दरम्याने होणार आहे. या स्पर्धेसाठी जिल्ह्याचा पुरुष आणि महिला संघ पाठवायचा आहे. २०२२-२३ मधे सिंधुदुर्ग डिस्ट्रीक्ट कॅरम असोसिएशनची जिल्हा मानांकन स्पर्धा अद्याप न झाल्याने संघनिवडीसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी घेण्यात येणार आहे.
ही निवड चाचणी रविवार दि. ३१ जुलै २९२२ रोजी सकाळी ९:०० वाजता श्री पंचम खेमराज कॉलेज, सावंतवाडी येथे होणार आहे. सदर स्पर्धा पुरुष व महिला गटामधे होणार आहे. स्पर्धेसाठी प्रवेश अर्ज देण्याची अंतिम तारीख गुरुवार दि . २८ जुलै संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत आहे.
सन २०२२-२३ ची खेळाडू नोदणी फी रु ५० व स्पर्धा प्रवेश फी रु ५० असे रु १००/- प्रवेश शुल्कासह आपली नावे खालील तालुका प्रतिनिधींकडे द्यावीत.
सावंतवाडी – राजेश निर्गुण
कुडाळ – शुक्राचार्य म्हाडेश्वर
वेंगुर्ला – ओंकार कुबल
कणकवली – पांडुरंग पाताडे
देवगड – योगेश कोळी
अंतिम मुदती नंतर आलेल्या प्रवेशिका विचारात घेण्यात येणार नाहीत.
ही स्पर्धा अखिल भारतीय कॅरम महासंघाच्या प्रचलीत नियमावलीनुसार खेळवण्यात येईल. खेळाडूंनी जिल्ह्याचे नाव व सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असो. चा लोगो असलेला पांढरा टी शर्ट आणि फूल पॅन्ट असा युनिफॉर्म घालून सामने खेळणं अनिवार्य आहे. या स्पर्धेमधून ६ पुरुष आणि ६ महिलांचा संघ राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवडण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग डिस्ट्रीक्ट कॅरम असोसिएनचे चिटणीस योगेश फणसळकर ( ९४२२६३३४०३) यांच्याशी संपर्क साधावा.