You are currently viewing यंदाच्या आर्ट बिट्स फाउंडेशन पुणे संस्थेचा “युवा गौरव पुरस्कार २०२२” पिंगुळी येथील भजनी बुवा वैभव गोविंद सावंत यांना जाहीर

यंदाच्या आर्ट बिट्स फाउंडेशन पुणे संस्थेचा “युवा गौरव पुरस्कार २०२२” पिंगुळी येथील भजनी बुवा वैभव गोविंद सावंत यांना जाहीर

कुडाळ :

 

तालुक्यातील पिंगुळी येथील भजनी बुवा वैभव गोविंद सावंत यांना आर्ट बिट्स फाउंडेशन पुणे या संस्थेकडून दिला जाणारा युवा गौरव पुरस्कार २०२२ हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. नुकतेच त्यांना समारंभपूर्वक कार्यक्रमात या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल त्यांचे जिल्हाभरातून अभिनंदन होत आहे.

वयाच्या दहाव्या वर्षी पासूनच वैभव सावंत यांनी कला या क्षेत्रामध्ये आपल्या वाटचालीस सुरुवात केली. सर्वप्रथम वैभव यांनी हार्मोनियम वाजविण्याची कला शिकायला सुरुवात केली. त्यासाठी वडिलांकडून त्यांना घरातूनच हार्मोनियम शिकण्याचे बाळकडू मिळाले. त्यानंतर शास्त्रीय भजन शिकण्याचा ध्यास घेत त्यांनी गुरुजी विशाल राणे बुवा यांच्याकडे शिक्षण सुरू केले. अलीकडच्या या पंधरा वर्षात सद्गुरु संगीत भजन मंडळ कुडाळच्या अनेक डबलबारी सामने, भजन स्पर्धा यामध्ये नंबर व नावलौकिक मिळवला. तसेच दशावतार नाटके व एकांकिका स्पर्धांमध्ये साथसंगत करत आहेत.

आत्ताच सुरू असलेली ढ मंडळीची ‘बिलिमारो’ ही एकांकिका खूप लोकप्रिय झाली आणि या एकांकिकेला सुद्धा वैभव यांनी हार्मोनियम साथ केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 + one =