सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागा मध्ये संशोधन प्रयोगशाळेचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योगपती श्री अजय दोडिया व सौ जयश्री दोडीया त्यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत खेमसावंत भोसले ,संस्थेच्या कार्याध्यक्षा सौ शुभदादेवी खेमसावंत भोसले ,कार्यकारी विश्वस्त युवराज लखम सावंत भोसले,युवराज्ञी सौ श्रद्धा राजे भोसले ,संस्थेचे संचालक प्रा.डी टि. देसाई ,सहसंचालक अॅड. श्यामराव सावंत , डॉ सतीश सावंत ,श्री जयप्रकाश सावंत , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी एल भारमल ,वनस्पतिशास्त्र विभागप्रमुख डॉ यु एल देठे , सौ.रमा सावंत , आयक्यूएसी समन्वयक डॉ बी एन हिरामणी, श्री संतोष सावंत , वनस्पतिशास्त्राचे डॉ यू आर पवार ,डॉ व्ही टी अपराध , प्रा. डीडी गोडकर महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.उद्योगपती श्री अजय दोडिया सौ जयश्री दोडिया यांनी महाविद्यालयाच्या विविध विभागांना सदिच्छा भेट दिल्या . विविध विज्ञान विभागातील प्रायोगिक उपकरणे बघून समाधान व्यक्त केले .