सावंतवाडी
नाबार्ड ग्रामीण पायाभूत विकास निधीतून कोलगाव येथे अठराशे मॅट्रीकटन क्षमतेच्या शासकीय गोदामाची इमारत उभारण्यात आली आहे. सदर कामात शासनाच्या माध्यमातून करोडो रुपये खर्च करून मोठा आर्थिक भ्रष्टाचार करण्यात आला आहे. गेली ३ वर्ष ही गोदामाची इमारत धुळ खात आहे. पायाभूत सुविधा देखील येथे नाहीत. ही इमारत आता अवैध धंद्यांचा अड्डा बनत चालली आहे.
प्रशासनाच्या माध्यमातून या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. ठिकाणी जाण्यासाठीचा मुख्य रस्ता ते गोदाम हा मार्ग अरूंद आहे. यामध्ये असणारा पूल नाजूक अवस्थेत आहे. त्यामुळे अवजड वाहतूक झाल्यास पूल कोसळण्याची शक्यता आहे. तर या रस्त्यावरून मालवाहू गाडी देखील जाण शक्य नाही. ज्या ठिकाणी माल उतरवला जाणार आहे त्या ठिकाणी घळणं आहे. ६ फुट अंतर सुद्धा नाही आहे. त्यामुळे
त्यामुळे मालवाहू ट्रक येथे उभे देखील राहू शकत नाही. याबाबत विचारणा केली असता बांधकाम विभाग पुरवठा विभागावर ढकलत आहेत. ही जागा पुरवठा विभाग ताब्यात घेऊ शकत नाही. घेतल्यास तीचा उपयोग देखील नाही. त्यामुळे ही जागा निवडणाऱ्या अधिकाऱ्यांसह संबंधितांवर कारवाई कारवाई व्हावी, अन्यथा १५ ऑगस्टला उपोषण करणार असल्याच राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी म्हणाले.
यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर मोटार संघटना अध्यक्ष बावतीस फर्नांडिस तालुका उपाध्यक्ष संतोष जोईल जिल्हा उपाध्यक्ष अल्पसंख्यांक इफ्तेकार राजगुरू तालुका कार्यकारणी सदस्य राकेश नेवगी तालुका चिटणीस काशिनाथ दुभाषी,आदी उपस्थित होते.