You are currently viewing निसर्ग!!!

निसर्ग!!!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री भारती नेहेते, बोरिवली लिखित अप्रतिम काव्यरचना*

*निसर्ग!!!*

वसंत ,ग्रीष्म ,वर्षा ,शरद,
हेमंत ,शिशिर रे ||धृ||
प्रत्येक ऋतुत निसर्गाचे,
रूप आगळे हे ||१||
ऋतुप्रमाणे फळे नि भाज्या,
देतो आपणांसी ||२||
आरोग्याची काळजी घ्यावी ,
आम्हां कळण्यासी ||३||
हिरवे हिरवे डोंगर देती,
डोळ्यां गार हवा ||४ ||
मनालाही अल्हादती ,
पशु पक्षी नी वारा ||५||
याचे मोल कधीच मागत,
नसतो तो आम्हां ||६||
निसर्गाचे घ्यावे कोणते?
गुण कळेना आम्हां?||७||
निस्वार्थीपणे देतच राहतो,
जीवन सुंदर होण्या ||८||
पाण्यासारखा अमूल्य ठेवा,
देतो निरोगी राहण्या ||९||
मित्र नसे ना का कोणी ,
निसर्ग खरा सोबती ||१०||
जाऊ त्याच्या सानिध्या ,
अन् करू गुजगोष्टी ||११||
तोच देई निरोगी आयुष्याचा,
मंत्र खरा ||१२||
असाच आम्हां मित्र हवा ना,
मैत्री त्याची जपा ||१३||
देई तुम्हाला सुखी आयुष्य ,
जतन करा हो त्याला ,
जतन करा हो त्याला,
जतन करा हो त्याला.||१४ ||

*भारती नेहेते*
बोरिवली, मुंबई

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 5 =