You are currently viewing मैत्रीतुन प्रीति

मैत्रीतुन प्रीति

*भारतीय सांस्कृतिक व साहित्य मंच कोल्हापूर समूहाचे सदस्य डॉ.श्रीकांत औटी लिखित अप्रतिम काव्यरचना*

*मैत्रीतुन प्रीति*

सांगु कशी तुला रे !
मैत्रीस बाध आली !!
मैत्रीच्या कळ्यांची
बहरुन प्रीत झाली !

भिडताच नेत्र नेत्रा
वाटे सलज्ज गोडी!
परि भावनांतराने,
वाटे बघ लाज थोडी !!

वाटे असे सुटावे,
धुंदित गीत गावे !
आजन्म मी च तुझीया
चित्तात ते वसावे !!

सांगु कशी तुला रे,
जनरित आड आली !
हुरहुर अंतरीची
अवघीच मूक झाली !!

©️ डाॅ.श्रीकांत औटी

प्रतिक्रिया व्यक्त करा