You are currently viewing भूतली वैकुंठ

भूतली वैकुंठ

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री ज्योत्स्ना तानवडे यांचा साकव्य अभंग लेखन स्पर्धेत सर्वोत्कृष्ट क्रमांक प्राप्त अभंग रचना*

🙏 *भूतली वैकुंठ* 🙏

वैकुंठ पंढरी | आषाढीची वारी |
भावे नेम करी | दर साल || १ ||

वाट पंढरीची | ओढ विठ्ठलाची |
साथ भाविकांची | मेळा चाले || २ ||

श्रद्धेचा मृदुंग | मनाचा अभंग |
संकीर्तनी दंग | नाम घेई || ३ ||

देहबुद्धी सोडी | लोभ माया तोडी |
अभंगाची गोडी | मना जडे || ४ ||

रिंगण जन्मांचे | धावणे मनाचे |
चंदन भक्तीचे | लावियले || ५ ||

वारीतले क्षण | जीवन शिक्षण |
संत शिकवण | मनी ठसे || ६ ||

पूर्व सुकृताची | वारी पंढरीची |
ध्वजा वैष्णवांची | फडकते || ७ ||

ज्योत्स्ना तानवडे.
वारजे,पुणे.५८

प्रतिक्रिया व्यक्त करा