सिंधुदुर्गनगरी
58, महाराष्ट्र बटालियन ओरस सिंधुदुर्ग अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या भारतीय थल सेना कॅम्प व कम्बाईन ॲन्युयल ट्रेनिंग कॅम्प मध्ये लायन्स ग्रुप मालवण यांच्या वतीने योगाचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी कॅम्पला उपस्थिती 307 एनसीसी कॅडेट्सनी या योग प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घेतला.
यावेळी लायन अध्यक्ष वैशाली शंकरदास, लायन सेक्रेटरी व योग साधक अनुष्का चव्हाण, लायन खजिनदार अंजली आचरेकर, योग गुरु व लायन जयश्री हडकर, योग गुरु सिद्धी माणगावकर, योग साधक केतकी सावजी, योग साधक मीरा बांदकर योग साधक व नंदिनी गावकर या उपस्थित होते. योग गुरु व योगसाधक यांनी योगाचे महत्त्व योगाची आसने करून दाखवली. या प्रशिक्षणामुळे एनसीसी विद्यार्थ्यांना आरोग्य संपन्न राहण्यासाठी प्रेरणा मिळाली.
कमांडिंग ऑफिसर कर्नल दीपक कुमार दयाळ, सेना मेडल प्राप्त, ॲडम ऑफिसर कर्नल लेखराज, सुभेदार मेजर दिनेश गेडाम, सुभेदार देवेंद्र सिंह, सुभेदार तुकाराम खैरनार, सुभेदार इंद्र केस, नायब सुभेदार जितेंद्र तिवारी, सुभेदार आर. एन. भांजा, यांच्या अधिनस्त हे शिबीर सुरू आहे. तसेच एनसीसी असोसिएट ऑफिसर अधिकारी लेफ्टनंट प्रा. डॉ. एम. आर. खोत सिंधुदुर्ग कॉलेज मालवण, द्वितीय अधिकारी आनंदा बामणीकर, तृतीय अधिकारी रविराज प्रधान एस. एम. हायस्कूल कणकवली, सागर गुरव माध्यमिक विद्यामंदिर कनेडी हे उपस्थित होते. सूत्रसंचालन लेफ्टनंट प्राध्यापक डॉ.एम. आर. खोत यांनी केले. तर आभार प्रदर्शन रविराज प्रधान यांनी केले.