You are currently viewing माजगाव येथील भाजपाचे अ‍ॅड.सचिन गावडे अडकले शिवबंधनात…

माजगाव येथील भाजपाचे अ‍ॅड.सचिन गावडे अडकले शिवबंधनात…

सावंतवाडी

माजगाव येथील भाजपाचे कार्यकर्ते अ‍ॅड. सचिन गावडे यांनी आज आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. आगामी काळात होणार्‍या ग्रामपंचायत निवडणूकीत त्याच्या वहिनी पुजा गावडे या सदस्य पदासाठी उभ्या आहेत.

दरम्यान जिल्हा प्रमुख संजय पडते यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवबंधन बांधले. दरम्यान आगामी काळात होणार्‍या ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला त्याचा फायदा होणार आहे. आज येथील शिवसेना शाखेकडे त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.

यावेळी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख विक्रांत सावंत, माजी सभापती चंद्रकांत उर्फ बाळा गावडे, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, माजी पंचायत समिती सदस्य मायकल डिसोजा, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, आबा सावंत, सुनील गावडे तसेच राजन पाटकर, नरहर शिरोडकर, राहुल सोनाळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा