You are currently viewing “स्ट्रीट फूड वेंडर” चे प्रशिक्षण घेतलेल्या ६० विद्यार्थ्यांना प्रणामपत्र वाटप

“स्ट्रीट फूड वेंडर” चे प्रशिक्षण घेतलेल्या ६० विद्यार्थ्यांना प्रणामपत्र वाटप

सावंतवाडी :

प्रधानमंत्री कौशल्य विकास केंद्राअंतर्गत “स्ट्रीट फूड वेंडर” चे प्रशिक्षण घेतलेल्या चार-चार विद्यार्थ्यांचे समूह तयार करून उद्योगासाठी आवश्यक असलेला प्रस्ताव तयार करा, आम्ही त्यांना कर्ज उपलब्ध करून देऊ, असा शब्द कौशल्य विकास केंद्राच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनी दिला. दरम्यान येथील एस. एस. आय कम्प्युटरच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या केंद्रात विद्यार्थ्यांना उत्तमरीत्या प्रशिक्षण दिले जात आहे, असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी काढले. या ठिकाणी “स्ट्रीट फूड वेंडर” चे प्रशिक्षण घेतलेल्या ६० विद्यार्थ्यांना आज प्रणाम पत्राचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी “त्या” बोलत होत्या.

यावेळी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, कौशल्य विकास सिंधुदुर्गचे नामदेव सावंत, एस. एस. आय. कम्प्युटरचे प्रमुख रघुनाथ तानावडे, संकेत गावडे, मंदार परब, चिन्मई केळबाईकर, सुखदा नाईक, कविता नाईक, प्रतीक्षा कांबळे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी वर्मा पुढे म्हणाल्या, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना विविध प्रशिक्षण दिली जात आहेत. यात विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी “स्ट्रीट फूड वेंडर” चे प्रशिक्षण दिले जाते. येथील एस. एस. आय कम्प्युटरच्या माध्यमातून हे प्रशिक्षण आपण या ठिकाणी घेतला आहात. आता त्याचा उपयोग प्रत्येकाला रोजगार निर्माण करण्यासाठी करायचा आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा