You are currently viewing सरंबळ अंगणवाडी शाळेला सामाजिक कार्यकर्ते योगेश नाईक यांचा मदतीचा हात

सरंबळ अंगणवाडी शाळेला सामाजिक कार्यकर्ते योगेश नाईक यांचा मदतीचा हात

कुडाळ:

 

सरंबळ अंगणवाडी शाळा नं 1 या शाळेमध्ये पाण्याची व्यवस्था नव्हती. याबाबत अंगणवाडीतील सेविका सौ मगंल मेस्त्री यांनी सामाजिक कार्यकर्ते योगेश नाईक यांच्याशी संपर्क साधून शाळेमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून द्यावी, अशी विनंती केली होती. त्याप्रमाणे नाईक यांनी पुढाकार घेऊन काल नळयोजना पुर्ण करुन दिली. त्यांच्या या कार्याबद्दल अंगणवाडी सेविकांना आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा