‘स्ट्रीट फूड वेंडर’ च्या प्रशिक्षणार्थ्यांना प्रणामपत्र वाटप – एस. एस. आय कॉम्प्युटरचा पुढाकार
सावंतवाडी
एस. एस. आय कॉम्प्युटरच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या केंद्रात ‘स्ट्रीट फूड वेंडर’ चे प्रशिक्षण घेतलेल्या ६० विद्यार्थ्यांना प्रणाम पत्राचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी प्रधानमंत्री कौशल्य विकास केंद्रा अंतर्गत “स्ट्रीट फूड वेंडर” चे प्रशिक्षण घेतलेल्या चार-चार विद्यार्थ्यांचे समूह तयार करून उद्योगासाठी आवश्यक असलेला प्रस्ताव तयार करा आम्ही त्यांना कर्ज उपलब्ध करून देऊ असा शब्द कौशल्य विकास केंद्राच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनी दिला.
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना विविध प्रशिक्षण दिली जात आहेत. यात विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी “स्ट्रीट फूड वेंडर” चे प्रशिक्षण दिले जाते. येथील एस. एस. आय कम्प्युटरच्या माध्यमातून हे प्रशिक्षण आपण या ठिकाणी घेतला आहात. आता त्याचा उपयोग प्रत्येकाला रोजगार निर्माण करण्यासाठी करायचा आहे. त्या दृष्टीने या ठिकाणी प्रशिक्षण घेतलेल्या चार- चार मुलांनी एकत्र येऊन उद्योग सुरू करावेत, त्यासाठी आवश्यक असलेला प्रस्ताव आमच्याकडे सादर केल्यास आम्ही कर्जपुरवठा करू असा शब्द त्यांनी दिला.
तर एस. एस. आय कॉम्प्युटरच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या केंद्रात विद्यार्थ्यांना उत्तमरीत्या प्रशिक्षण दिले जात आहे असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी काढले.
यावेळी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, कौशल्य विकास सिंधुदुर्गचे नामदेव सावंत, एस. एस. आय. कॉम्प्युटरचे प्रमुख रघुनाथ तानावडे, संकेत गावडे, मंदार परब, चिन्मई केळबाईकर, सुखदा नाईक, कविता नाईक, प्रतीक्षा कांबळे आदी उपस्थित होते.