You are currently viewing मनसे तर्फे दहावीच्या परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

मनसे तर्फे दहावीच्या परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

आई वडिलांचा आदर करा,मोबाईलचा अति वापर टाळा –  परशुराम(जीजी) उपरकर

मनसे च्या वतीने दहावी परीक्षेत प्रथम तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मनसे राज्य चिटणीस जिजी उपरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. आरोस विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आरोस , च्या कै.भाऊ पांगम सभागृह येथे मनसे शाखा आरोस यांच्या वतीने आयोजित केलेल्या दहावी परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यां चा सत्कार समारंभ संपन्न झाला .या कार्यक्रमाची सुरुवात जिजी उपरकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून व दीप प्रज्वलन करुन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व मनोगत व्यक्त करण्यात आली.यावेळी जिजी उपरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की,मुलांनी आपल्या आई वडिलांचे श्रम वाया जाऊ देऊ नये ,प्रामाणिक प्रयत्न केल्यास यश हमखास मिळू शकते.तसेच मुलांनी मोबाईल चा वापर योग्य गोष्टी साठीच करावा.अती वापर टाळण्याचे आवाहन केले.तसेच शाळेच्या कामासाठी लागणारी मदत , आपल्या पक्षाकडून,संघटनेकडून होण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी मनसे आरोस शाखेच्या वतीने आरोस, मळेवाड , कोंडूरे ,आजगाव या हायस्कूल च्या दहावीत प्रथम तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर यावेळी मनसे मळेवाड मतदार संघ अध्यक्ष मंदार नाईक,सावंतवाडी शहराध्यक्ष,आशिष सुभेदार, उपशहरअध्यक्ष शुभम सावंत, आरोस शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष निलेश परब,उपाध्यक्ष महादेव पांगम,शाळा व्यवस्थापन अध्यक्ष हेमंत कामत, आरोस शाखाअध्यक्ष प्रवीण आरोसकर नंदू परब मुकुंद धारगळकर धाकोरे शाखाध्यक्ष निलेश मुळीक अभय देसाई संतोष सावंत,मिलिंद जोग,धनेश नाईक,मनसैनिक तसेच शाळेचे मुख्याध्यापक सदाशिव धूपकर,शिक्षक निलेश देऊलकर, सुषमा मांजरेकर मॅडम ,शाळेचे शिक्षक वृंद,कर्मचारी, पत्रकार मदन मुरकर, विद्यार्थी,पालक, मनसे सैनिक आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश देऊलकर,प्रास्तविक प्रशालेचे मुख्याध्यापक सदाशिव धुपकर तर आभार प्रदर्शन सुषमा मांजरेकर मॅडम यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा