*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त लेखक कवी गझलकार जयराम धोंगडे लिखित अप्रतिम गझल रचना*
*पैज*
काही असे म्हणाले काही तसे म्हणाले,
पैजेत कासवाच्या, आले ससे म्हणाले!
होता घमंड भारी तो भोवला सशाला,
विसरून पैज गेला, झाले हसे म्हणाले!
तो चपळ एवढा की चित्त्यास घाम येतो,
मग कासवापुढे या, झाले कसे म्हणाले?
जिंकू नयेत कोणी हा सापळा तयांचा,
हरवावयास घेऊ, हाती वसे म्हणाले!
होते असेच आहे या जीवनात हल्ली,
मग फसवता खुबीने, होते फसे म्हणाले!
*जयराम धोंगडे, नांदेड*