आपणं आपल मतं विकलं काय* *भाग ३*

*भ्रष्टाचार विनोदी जन आक्रोश समिती पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा संस्थापक अध्यक्ष अहमदनगर यांचा लेख*

*आपणं आपल मतं विकलं काय* *भाग ३*

संविधानाने आपणांस मतदान या माध्यमातून आपलं मत मांडून आपला प्रतानिधी निवडण्याचा अनमोल अधिकार दिला आहे. पण आज आपलीच मुले आज राजकीय संघटना पक्ष मग ते गणपती मंडळ. नवरात्र उत्सव मंडळ. या ठिकाणी आपलीच मुले अध्यक्ष म्हणून नेमली जातात. हे सर्वात षडयंत्र राजकीय आहे कारणं राजकीय लोकांची मुलं स्टडी रुममध्ये आणि आपली मुले राजकीय नेते यांच्या सांगण्यावरून बंद आंदोलन संप मोर्चे रास्तारोको.अशी विविध आंदोलन करायला लागतात आणि त्यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडल्यास पोलिस केंस होते ती म्हणजे आपल्या मुलावरच आणि आपल्या मुलांचे जीवन बरबाद होते.
निवडणूक दिनांक जाहीर झाल्यावर नेते पुढारी आमदार खासदार मंत्री यांचें बगलबच्चे पांढरी कपडे घालून कार्यकर्ता म्हणून फिरतात मग हेच ते बगलबच्चे आहेत जे नेते आमदार खासदार पुढारी मंत्री यांच्या नावाखाली खाजगी सावकारकी ‌ गुंडगिरी. टोळीयुद्ध. लोकांचे भूखंडावरील अतिक्रमण. हाॅटेल धाबे. बार. यांवर दमदाटी करून दंगा तोडफोड करणे . निवडणूक कालावधी मध्ये आपल्या नेत्यांचा सकारात्मक प्रचार करणे. मतदार यांना दमदाटी करणे. मतदारांना उचलून नेणे. मतदार आणि कार्यकर्ते यांच्या जेवन दारू याची व्यवस्था करणे. अशी अनेक कामे नेत्यांच्या सांगण्यावरून हे सर्वजण करत असतात. म्हणजे निवडणुकीत गुंडगिरी पैशांचा अपव्यय अशा घटना घडतच असतात . यामुळे जनतेच्या विकास कामांचा बोजवारा उडतो.
घरकुल घोटाळा. भूखंड घोटाळा. विकास योजना घोटाळा. पेन्शन घोटाळा. घरपट्टी पाणीपट्टी घोटाळा. भुयारी गटार योजना घोटाळा. रस्ते निधी घोटाळा. गटार घोटाळा. स्मशानभूमी बांधकाम घोटाळा. समाजमंदिर घोटाळा. अ़गणवाडी मुलांच्या खाऊमधये घोटाळा. असे विविध घोटाळे आपण रोज वृतमानपत्रात वाचतो टिव्ही वर बघतो आणि विसरतो मला काय करायचं आहे. आरे आपणं मुर्खपणा चे सर्व पायर्या पार करतो कारणं या नेत्यांना आपणच आपलं बहुमोल मत देऊन निधी खाण्यास सोडले आहे. म्हंजे आपलं मत आपणं विकलं आणि यांनी निवडून आल्यावर गाव शहरं तालुका जिल्हा विकला म्हंजे चारी बाजूंनी लुटच आहे.
मतदानावेळी घडणारे अनेक अनुचित प्रकार आपणं वारंवार अनुभवले आहेत ‌ . कार्यकर्ता नेत्यांसाठी आणि नेत्याला उमेदवारी मिळवण्यासाठी आत्मदहन. टाॅवर वर चढून आंदोलन. रस्त्यावरून अनवाणी फीरेण अशी प्रतिज्ञा करतात खरोखरच नेता तुमच्यासाठी कधी उपाशी राहीला आहे कां? त्यांनी त्यांचे दौरे जे आपल्याच पैशातून पोलिस फौजफाटा तोही आपल्याच पैशातून नेत्याला बंदोबस्त बाॅडिगारड यांचा सुद्धा खर्च आपल्याच डोक्यावर असतो वेळ पडल्यास हाच नेता गट पक्ष बदलतो त्यावेळी जनतेची बाजु घेतील काय? वेगळा पक्ष काढला त्यावेळी जनतेचे हित बाजूला कोट्यवधी रुपये घेऊन आपण दिलेल्या मताचा बाजार मा़डला आणि करोडो रुपयांची मालमत्ता गोळा केली त्यावेळी जनता दिसली नाही कां? कोणत्याही नेत्याने आपली मालमत्ता गोरगरीब मुलांच्या व्यवसाय नोकरी बेरोजगारी हटाव यासाठी एक ही रुपया खर्च केला आहे का? साधा नगरसेवक जरी झाला तरी तो एका वर्षात लाखोंची गाडी. बिल्डिंग बांधून विकायला चालू करतात एकरात यांचें पलाॅट आहेत कुठन आलं म्हणजे आपल्या मताला किती किंमत आहे आत्तातरी ओळखा. कार्यकर्ता मी याचा आणि त्याचा यातच डोकी फोडून घेतात आणि नेत एका जागेवर मांडीला मांडी लावून दारू पितात जेवणाच्या पार्ट्या करतात आणि कार्यकर्त्यांची टिंगल करतात तरि सुध्दा आपणांस लाज वाटली नाही.
मतदार म्हणून नोंदणी झाल्यावर आपणं प्रतिनिधींच्या निवडणुकीत मतदान करण्यास पात्र ठरतो ‌यासाठी मतदान केंद्राची संपूर्ण यंत्रणा निर्वाचित आयोगाच्या देखरेखीखाली केली जाते ‌ . याबाबत निश्चित स्वरूपाचे नियम आहेत.तयाचे पालन करण्याचा आटोकाट प्रयत्न निर्वाचित आयोगाकडून केला जातो.आपलया मतदान केंद्रावर जाऊन आपलं मत देण हा प्रत्येक मतदार यांचा हक्क आहे. परंतु बरेच वेळा मतदान केंद्राच्या वाटेवर अनेक अडचणीना मतदार यांना सामोरे जावे लागते. जाणूनबुजून काही समाजकंटक अडथळे उभे करतात त्यामुळे सापेक्ष होणारें मतदान गलिच्छ स्वरुपाचे होते. आपल्या विरोधात असणार्या मतदार यांना धाकदपटशा दाखवून तो मतदार केंद्रीवर येणार नाही यासाठी अटोकाट प्रयत्न केले जातात. विशेषत ग्रामीण भागातील दलित आदिवासी व गोरगरीब जनता.व अन्य दुर्बल घटकांना या सर्व प्रकाराला सामोरे जावे लागते.परंतु अलिकडच्या काळात यापेक्षा भयंकर प्रकार घडू लागलं आहेत ‌यात मत पेट्या पळविणे ‌मतदान केंद्रावर शसत्रबळचा वापर.व सर्व मत पेट्या मध्ये आपल्या इच्छेनुसार गतपत्रिका भरणे मतदान केंद्रावर हिंसाचार घडवून आणणे ‌मतदार यामध्ये भीती निर्माण करणे.इ गोष्टी आज प्रामुख्याने घडतं आहेत. या सर्वांचे कारणं म्हणजे राजकारणात वाढता गु़डाचा सहभाग गुन्हेगारी. उत्तर प्रदेश.बिहार राज्यांमध्ये हे आत्तापर्यंत घडतं होतं आत्ता या गोष्टी हळूहळू आपल्याकडं यायला सुरुवात झाली आहे.ही चिंचेची बाब आहे.या गैरप्रकारांना राजकीय नेते पुढारी आमदार खासदार मंत्री पोलिस यंत्रणा ‌सरकारीअधिकारी यांचं सगणमत असतं ‌या अशा हिंसाचार प्रकारामुळे ग्रामीण भागातील अशिक्षित गरिबी मतदार भयभीत झाला आहे.तर शहरात राहणारा पांढरपेशा मतदार या संपूर्ण प्रकियेबाबत उदासीन बनला आहे ‌या दोन्ही गोष्टी लोकशाही व्यवस्थेला मारक ठरत आहेत.
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रूग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधीक्ष
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९

प्रतिक्रिया व्यक्त करा