You are currently viewing 20 जुलै रोजी हुमरमळा वालावल गावातील 10 व 12 वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

20 जुलै रोजी हुमरमळा वालावल गावातील 10 व 12 वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

कुडाळ :

हुमरमळा वालावल गावातील दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा बुधवार दि. 20 रोजी सकाळी 11 वाजता ग्रामपंचायत हुमरमळा येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग डॉ. राजेंद्र दाभाडे हे प्रमुख उपस्थिती असणार आहेत. तरी सर्व ग्रामस्थांनी उपस्थित रहावे असे आवाहन ग्रामसेविका सौ.अर्पणा पाटील, ग्रामपंचायत सदस्य अमृत देसाई ,चंद्रकांत अंबाजी माडये, सौ. रमा गाळवणकर, सौ. गिरीजा गुंजकर,सौ सोनाली मांजरेकर,सौ. शिल्पा मयेकर यांच्या तर्फे करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × four =