You are currently viewing इचलकरंजी पञकार कवि मंचच्या काव्य संमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद

इचलकरंजी पञकार कवि मंचच्या काव्य संमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद

उत्कृष्ट काव्य सादरीकरणाने उपस्थितांची मिळवली वाहवा

इचलकरंजी / प्रतिनिधी

इचलकरंजी येथे इचलकरंजी पञकार मंचच्या वतीने नवोदित कवी – कवयिञींसाठी आयोजित केलेल्या काव्य संमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी सहभागी कवींनी सामाजिक आशयावर आधारित उत्कृष्ट काव्य सादरीकरण करत उपस्थितांची वाहवा मिळवली.

इचलकरंजी शहर परिसरातील नवोदित कवी – कवयिञींसाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे,या उद्देशाने इचलकरंजी येथे श्रमिक पत्रकार संघ व इचलकरंजी प्रेस क्लब या दोन्ही संघटनांच्या वतीने इचलकरंजी पञकार कवी मंचच्या माध्यमातून
महापालिकेच्या पञकार कक्षामध्ये काव्य संमेलन आयोजित करण्यात आले होते.प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीत सरस्वती प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यानंतर स्वागत व प्रास्ताविकात श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष रामचंद्र ठिकणे यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करत चांगले साहित्यिक व कलाकार घडवण्यासाठी यापुढेही निश्चित प्रयत्न राहिल ,अशी ग्वाही दिली.
यानंतर सहभागी कवी – कवियञींनी
महापुर , शेतकरी , कष्टकरी ,वृक्षतोड , माणुसकी,शिक्षण , स्वच्छता , पाऊस, स्वातंत्र्य , दुरावलेले नातेसंबंध, दुष्काळ , पाणी टंचाई, लोकशाही व बदलती दुनिया अशा सातत्याने समाजाला भेडसावणाऱ्या विविध विषयांना आपल्या काव्याच्या उत्कृष्ट सादरीकरणातून स्पर्श करत त्यातून सामाजिक प्रबोधन करण्याचा प्रयत्न करत उपस्थितांची वाहवा मिळवली.यामध्ये मनिषा केसरकर ,सुवर्णा पोवार , धोंडिबा कुंभार , दादासाहेब जगदाळे ,संजय बत्ते,भाऊसाहेब केटकाळे, बाळकृष्ण म्हेत्रे, बसवराज कोटगी, दस्तगीर नदाफ ,सागर बाणदार , वृषाली होगाडे ,विलास सुतार , बळीराम कदम ,सात्ताप्पा सुतार , रविंद्र पडवळे ,पाटलोबा पाटील , रामचंद्र ठिकणे यांचा समावेश होता.यावेळी कवी गुणवंत जगताप यांनी लावणी , भारुडकार धर्मराज जाधव यांनी भारुड ,
ज्येष्ठ गझलकार प्रसाद कुलकर्णी यांनी गझल आणि सामाजिक कार्यकर्ते अहमद मुजावर यांनी शेर सादर करत या काव्य संमेलनाला आणखी रंगत आणली.यावेळी
पञकार अजय काकडे ,बाळासो पाटील , रविकिरण चौगुले , सुभाष भस्मे, संतोष काटकर , पंडित कोंडेकर , ऋषीकेश राऊत,अमर चिंदे ,शिवाजी येडवान ,मनोहर जोशी , सलिम संजापूरे यांच्यासह कवी – कवयिञी , साहित्यिक व साहित्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धोंडिबा कुंभार यांनी तर आभार प्रदर्शन पञकार शिवानंद रावळ यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा