सावंतवाडी
राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत, ग्रामपंचायत न्हावेली यांच्या सहयोगाने न्हावेली येथे एकदिवसीय कृषी शाळा प्रात्यशिक पार पडले. या कृषी शाळेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कृषी शाळे अंतर्गर न्हावेली भटाचे टेंब वाडी येथील शेतऱऱ्यांसमवेत येथील शेतात श्री पद्धतीने शेतीचे प्रात्यक्षिक दाखवत शेत लावणी करण्यात आली. यावेळी न्हावेली सरपंच प्रतिभा गावडे, उपसरपंच विठोबा गावडे, ग्रामपंचायत सदस्य शरद धाऊसकर, ग्रामसेविका तृप्ती राणे, कृषी सहाय्यक कविता सावंत व ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामस्थ आदींनी या शेती शाळेच्या प्रात्यक्षिक उपक्रमात सहभाग घेतला.