You are currently viewing मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विशेष बैठक – ११ ऑक्टोबरची एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विशेष बैठक – ११ ऑक्टोबरची एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली

 

मुंबई :

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी “११ ऑक्टोबर रोजी नियोजित असलेली आणि राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे”, या संदर्भात बोलावण्यात आलेल्या विशेष बैठकीनंतर ही घोषणा केली आहे. तसेचा या परीक्षेची पुढील तारीख चर्चा करून घोषित केली जाईल, असे त्यांनी सांगितले आहे.

 

महाराष्ट्रात जाहीर झालेल्या एमपीएससीच्या परीक्षेबाबत आज झालेल्या बैठकीत   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही चर्चा केली. सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

 

कोरोना पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसापासून राज्यात लॉकडाऊनची परिस्थिती होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करायला अवधी मिळावा, अशी मागणी करण्यात येत होती. याच मतावर एमपीएससीची ११ ऑक्टोबर रोजी होणारी परीक्षा काही काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

 

याबाबत एमपीएससीला माहिती देण्यात आली आहे. आता एमपीएससीशी बोलून परीक्षेची पुढची तारीख जाहीर केली जाईल. मात्र या तारखेला निश्चितपणे परीक्षा होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिल्यानंतर ११ ऑक्टोबरला होणाऱ्या एमपीएससी परीक्षेविरोधात मराठा समाज आक्रमक झाला होता. “परीक्षा पुढे ढकलण्यात यावी”, अशी मागणी मराठा समाजाकडून करण्यात येत होती. मराठा आरक्षणाबाबत आक्रमक झालेले संभाजीराजे छत्रपती यांनीही परीक्षा रद्द न झाल्यास एमपीएससीच्या केंद्रे ताब्यात घेण्याचा इशारा दिला होता.

 

यानुसार, एमपीएससीची रविवारी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मराठा समाजाच्या नेत्यांशी गुरुवारी दीर्घ चर्चा केली होती. या बैठका रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या.  मराठा नेत्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याबाबत सरकार अनुकूल असल्याचा दावा बैठकीनंतर केला होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − thirteen =