You are currently viewing सिंधुदुर्ग साईकृपा दिंव्याग शक्ती , कसाल या संस्थेमार्फत दिव्यांगासाठी उद्योग विकास निवारा केंद्र सुरू

सिंधुदुर्ग साईकृपा दिंव्याग शक्ती , कसाल या संस्थेमार्फत दिव्यांगासाठी उद्योग विकास निवारा केंद्र सुरू

सिंधुदूर्ग :

 

आज दिनांक १३ जुलै रोजी गुरूपौर्णिमा चे औचित्य साधुन सिंधुदूर्ग साई कृपा दिव्यांग शक्ती- कसाल या संस्थेच्या माध्यमातून निवारा केन्द्र सूरू करण्यात आलं.

यावेळी मान्यवर पाहुण्यांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष अनिल शिंगाडे यांनी केले. यावेळी दिव्यांग बांधव व भगिनींना मार्गदर्शन करताना अनिल शिंगाडे म्हणाले की आपण स्वतः च्या पायावर उभे राहण्यासाठी अशा प्रशिक्षणाची आवश्यकता आहे . दिंव्यागांनी कुणाकडे मदतीची अपेक्षा न करता स्वकतृत्वाने ताठ मानेने जगले पाहिजे, त्यासाठी अशा प्रशिक्षणाची आवश्यकता आहे .

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अप़ंग वित्त महाम़डळाचे पदाधीकारी व्यवस्थापक साळवी व परब ऊपस्थित होते. या निवारा कार्यशाळेत शामसुंदर लोट यांनी नागोबा बनवणे, झाडु बनवणे तसेच टाकाऊ वस्तू पासुन टीकाऊ वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण दिले .

या कार्यक्रमाला सौ श्रद्धा कदम , संगिता पवार , प्रसन्ना शीर्के , निलम राणे , दिक्षा तेली , मठकर आदि मान्यवर उपस्थित होते . सदर कार्यशाळेत २५ दिंव्याग उपस्थित होते .

सदरची कार्यशाळा ओरस – खर्येवाडी येथील शिवनेरी सोसायटी मधील दळवी यांच्या बंगल्यामध्ये सुरू असुन अजुनही जास्तीत जास्त लोकानी सहभागी व्हावे , असे आवाहन साईकृपा दिंव्याग शक्ती संस्थेच्यावतीने करण्यात आलं आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा