You are currently viewing १६ जुलै रोजी भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक

१६ जुलै रोजी भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक

उपराष्ट्रपती पदासाठीचा उमेदवार जाहीर होणार

 

भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक १६ जुलै रोजी होणार आहे. या बैठकीत उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार घोषित होऊ शकतो. ६ ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपती पदाची निवडणुक होणार आहे. या निवडणुकीकरिता १९ जुलै पर्यंत अर्ज भरता येणार आहे. राष्ट्रपती निवडणुकीत भाजपला सहकारी पक्षांसोबत अन्य काही पक्षांच्या पाठिंब्याची गरज आहे. तर उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपकडे पुरेसे संख्याबळ आहे. अशा स्थितीत भाजपच्या उमेदवाराविरोधात अन्य पक्षांकडून उमेदवार उभा न केला जाण्याची शक्यता आहे. वर्तमान लोकसभेत भाजपचे ३०३ खासदार आहेत. तर राज्यसभेत ९१ खासदार आहेत. याचबरोबर राज्यसभेतील ५ नामनिर्देशित सदस्य भाजपच्या उमेदवाराला मतदान करू शकतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा