सावंतवाडी
शिरोडा नाका येथील पंचायत समिती कार्यालयातील फाईलींच्या बाॅक्समध्ये आज अजगराचे पिल्लू आढळून आले. त्यामुळे कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. हे कार्यालय जंगलाच्या बाजूला असल्याने अशाप्रकारे सरपटणारे प्राणी वारंवार दिसतात, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे नवीन इमारतीचा प्रश्न सोडवण्यात यावा, अशी कर्मचाऱ्यातून मागणी होत आहे.