सिंधुदुर्ग
आज जिल्हा रुग्णालयात सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय चे नूतन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीमंत चव्हाण यांचे स्वागत जनरल प्रॅक्टिशनर्स व होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोविड-१९ आणि एकंदरीत सार्वजनिक आरोग्य यंत्रणेने जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य सेवेचा भार उचलणाऱ्या फॅमिली फीजीशीयन डॉक्टर्स ना विश्वासात घ्यावं आम्ही शासकीय यंत्रणेला निश्चित मदत करू. कोल्हापूर जिल्ह्याच्या धर्तीवर जिल्हा रुग्णालयात, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय येथील CCC आणि DCCC सार्व.आरोग्य यंत्र यांना आयुष वैद्यकीय अधिकारी म्हणून कोविड-१९ कंत्राटी सेवेत होमिओपॅथिक डॉक्टर्स ना संधी द्यावी. कोविड पोसिटीव्ह रुग्णांना DCCC आणि CCC येथे आयुष मंत्रालय व राज्याच्या Task Force ने सुचवलेला मार्गदर्शक सूचनेनुसार होमिओपॅथिक, आयुर्वेदिक व युनानी उपचार सुरू करावा.सर्व रुग्णालयात आयुष क्लिनिक ची स्थापना करावी. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ आणि होम आयसोलाशन पोझिटीव्ह रुग्ण यांच्या व्यस्थापनात फॅमिली फीजिशियन ना विश्वासात घ्यावे आम्ही पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहोत असे आश्वासन डॉक्टर्स शिष्टमंडळाने दिले. सिंधुदुर्ग जिल्ह्या ची आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी सर्वच खाजगी डॉक्टर्स चे सहकार्य घेतले जाईल असे आश्वासन नूतन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिले. येत्या आठवड्यात जिल्ह्यातील सर्व आरोग्य संघटना व वैद्यकीय संघटना यांची बैठक घेण्याचे नियोजन करीत आहे असेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले.
आज डॉ. प्रविण सावंत राज्य सरचिटणीस निहा, डॉ. दीपक ठाकूर जिल्हाध्यक्ष होमिओपॅथिक अससोसिएशन, डॉ. शरद काळसेकर सेक्रेटरी डॉक्टर्स फ्राटरनिटी क्लब, डॉ. अरुण गोडकर, डॉ. प्रकाश आघाव, डॉ.पुर्णेन्दू सावंत आदी डॉक्टर्स उपस्थित होते.