देवगड :
येथे तालुका कृषी विभागामार्फत ‘श्री पद्धतीने भात पीक लावणी प्रात्यक्षिक’ व ‘शेती विषयी मार्गदर्शन’ उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात छत्रपती शिवाजी कृषी विद्यालय किर्लोस च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. ग्रामीण कृषी जागरूकता व औद्योगिक कार्यानुभव आणि महाराष्ट्र शासन तालुका कृषी विभाग देवगडच्या संयुक्त विद्यमानाने हिंदळे भंडारवाडी येथील प्रगतशील शेतकरी सुनील कुलकर्णी यांच्या शेतीमध्ये “श्री” पद्धतीने भात पीक लागवड प्रात्यक्षिक घेण्यात आली.
ग्रामीण कृषी जागरूकता व औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत छत्रपती शिवाजी कृषी विद्यालय किर्लोसचे कृष दूत ऋतुराज सावंत, प्रद्युम्न माईनकर, पंकज आंबेरकर, आत्माराम माळकर, प्रज्योत परब, मुलिन्ति लक्ष्मी किशोर रेड्डी, आत्मकुरी वसंतराव रेड्डी आणि कृषी पर्यवेक्षक ए.पी. आपटे, कृषी सहाय्यक श्रीम. व्ही. एस तिरवडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीपेक्षा “श्री” पद्धतीचे भातपीक लागवडीचे महत्त्व स्पष्ट करून सांगितले.
या उपक्रमात हिंदळे सरपंच स्वरा पारकर, प्रगतशील व ज्येष्ठ शेतकरी वसंत कुलकर्णी, वनिता कुलकर्णी व शेतकरी ग्रामस्थ सहभागी झाले होते. हिंदळे गावांमध्ये अशाच पद्धतीने आणखीन शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये कृषीदूत व कृषी विभाग देवगड यांच्या मार्गदर्शनाखाली “श्री” पद्धतीने भातपीक लावणीचे प्रात्यक्षिके घेण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.