You are currently viewing वेंगुर्ल्यात कापड दुकानास आकस्मित आग

वेंगुर्ल्यात कापड दुकानास आकस्मित आग

वेंगुर्ला :-

वेंगुर्ले शहरातील सुंदरभाटले येथील साईमंगल कार्यालयासमोर भागात असलेले श्रीमती रोजी मॅक्सी फर्नांडीस यांच्या इमारत गाळ्यातील श्रीमती अल्मास अश्रफ मुजावर यांच्या ‘गुलजार लेडीज टेलर, कलेक्शन’ नावाच्या कापड दुकानांस सोमवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारांस आकस्मित आग लागून कापड दुकानांतील सर्व माल जळन खाक पडला.

यात दुकानदाराच्या इमारतीचे साडेतीन लाख तर कापडदुकानाचे दोन लाख रूपये असे मिळून एकूण साडेपाच लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. सदरची आग वेंगुर्ले नगरपरीषदेच्या अग्निशामक दलाने दिड तासांत आटोक्यात आणली पण भल्या मोठय़ा आगीत दुकानातील सर्व माल बेचिराख झाला. सदरची आग हि शॉर्टसर्किमुळे लागल्याची माहिती कापड दुकान चालक यांनी पंचनाम्यावेळी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा