You are currently viewing कुडाळ मध्ये भाजपकडून चक्काजाम…

कुडाळ मध्ये भाजपकडून चक्काजाम…

खड्डे बुजवण्यावरून, साईडपट्टी वरील चिखलाच्या साम्राज्यावरून भाजपा आक्रमक..

रस्त्यांवर पडलेल्या खड्यावरून केले रास्तारोको आंदोलन, नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्याने आंदोलन घेतले मागे.

कुडाळ

कुडाळ शहरात रस्त्यांवर वाढलेल्या खड्डयांबाबत आज दुपारी कुडाळ शहर भाजपतर्फे रास्तारोको आंदोलन छेडण्यात आले. यावेळी प्रशासनाच्या कामकाजाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शहरातील पोलीस स्टेशनच्या नजीकच असलेल्या रस्त्यावर पडलेल्या खड्डयाच्या बाजूलाच भाजप शहर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन छेडले. यामुळे वाहतूककोंडीचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे घटनास्थळी कुडाळचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे आणि त्यांची टीम हजर झाली. काही वेळातच कुडाळ नरगरपंचायचे मुख्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून लवकरच खड्यांचा प्रश्न मार्गी लावला जाईल, असे आश्वासन दिले .कुडाळ पोलिस स्टेशन, गांधी चौक, सह मुख्य रस्ताजवळ साईडपट्टी नजीकच्या साचलेल्या चिखलाच्या साम्राज्यावरून नागरिकांना होणार्‍या त्रासावरून आंदोलन छेडण्यात आले होते.

या आंदोलनात भाजपचे युवा नेते आनंद शिरवलकर, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, भाजप शहर अध्यक्ष राकेश कांदे, शक्ती केंद्रप्रमुख राकेश नेमळेकर, नगरसेविका प्राजक्ता बांदेकर, नगरसेवक निलेश परब, नगरसेवक गणेश भोगटे, नगरसेवक राजीव कुडाळकर ,नगरसेविका चांदणी कांबळी, बंड्या सावंत, राजा पडते, प्रज्ञा राणे , रेवती राणे आदी सहभागी सामील झाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा