You are currently viewing गुरू शिष्य वृद्धिंगत करणारी “गुरुपौर्णिमा” उद्या सावंतवाडीत

गुरू शिष्य वृद्धिंगत करणारी “गुरुपौर्णिमा” उद्या सावंतवाडीत

फरा प्रतिष्ठान केर व स्नेहबंध गृप दोडामार्गचे आयोजन

दोडामार्ग

दशावतार हा कोकणात कलेचा राजा मानला जातो. रात्रीचा राजा व दिवसा कपाळावर बोजा असे दशावताराचे वर्णन केले जायचे त्याच दशावतारात आता बदल होताना दिसत आहेत. मात्र लोकाश्रयाबरोबर या कलेला राजाश्रय मिळणे तेवढेच क्रमप्राप्त आहे, काही संस्था, प्रतिष्ठाण ही या कलेला व कलाकारांना प्रोत्साहन देण्याचे काम नेहमीच करत आलेले आहे असेच दशावतार कलेच्या मागे खंबीरपणे नेहमी उभे राहणारे प्रेमानंद देसाई यांच्या संकल्पनेतून फ रा प्रतिष्ठान केर व स्नेहबंध गृप दोडामार्ग यांच्या माध्यमातुन दशावतारातील गुरू शिष्य परंपरा वृद्धिंगत करणारी आगळी वेगळी गुरुपौर्णिमा उद्या सावंतवाडीत आयोजित करण्यात आली आहे. यातून दशावतारातील गुरुवर्य कलाकार आणि त्याचे शिष्य यांच्यातील प्रेममेळा उपस्थितांना अनुभवता येणार आहे.

दशावतार कलेचे जतन, संवर्धन करून ही कला वृद्धिंगत व्हावी यासाठी सदर गुरूंचे अनमोल मार्गदर्शन नवोदित कलाकारांना मिळणार आहे. हा कार्यक्रम काझी शहाबुद्दीन हॉल सावंतवाडी येथे १३ जुलै २०२२ रोजी सकाळी ९ ते १२ यावेळेत संपन्न होणार असून उपस्थित राहण्याचे आवाहन फरा प्रतिष्ठान व स्नेहबंध च्या वतीने अध्यक्ष प्रेमानंद देसाई व ऍड. सोनू गवस यांनी केले आहे, या कार्यक्रमास दत्तमाऊली दशावतार पारंपारिक नाट्यमंडळ, सिंधुदुर्ग व महापुरुष दशावतार नाट्यमंडळ गोठोस सावंतवाडी यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा