वेंगुर्ला :
वेंगुर्ले तालुक्यातील विद्या प्रसारक विश्वस्त मंडळ परुळे संचलित, अण्णासाहेब देसाई विद्या मंदिर परुळे या माध्यमिक प्रशालेतून ३८ वर्षे अध्यापनाचे कार्य करुन ३१ मे २०२२ मध्ये सौ. सुलभा गजानन देसाई या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या. याप्रसंगी त्यांचा शुभेच्छा समारंभ प्रशालेत संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे माजी मुख्याध्यापक श्री बळीराम नाईक सर होते. ३८ वर्षांची प्रदीर्घ सेवा उत्तमरित्या पूर्ण केल्याबद्दल शाळा व संस्था यांच्याकडून त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांना संस्थेच्या वतीने अविनाश देसाई, शिक्षकांमधून सौ रीमा ठाकूर मॅडम, विद्यार्थ्यांमधून तन्वी गुंजाळ, अवंतिका देसाई, मैत्री सामंत व अर्पिता सामंत आणि पालकांमधून पूजा प्रसाद सामंत यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष नाईक सर यांनी देसाई मॅडम यांच्या कारकिर्दीचा आढावा घेतला.
आपल्या सत्काराला उत्तर देताना सौ. देसाई मॅडम यांनी संस्थेविषयी कृतज्ञता व्यक्त केली. प्रशालेचे कौतुक करून त्यांनी विद्यार्थ्यांना प्रशालेचे नाव उंचावण्याचे अवाहन केले. या कार्यक्रमास संस्था पदाधिकारी गजानन देसाई, पालक शिक्षक संघाचे सदस्य नेहा प्रभू, सरोज सामंत, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक सचिन माने यांनी केले. सौ गंगा वैद्य यांनी निवेदन तर आभार श्री प्रभू पंचलिंग यांनी मानले.