ओरोस :
तेली समाज उन्नती मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा व गुणगौरव समारंभ रविवार २४ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता ओरोस इच्छापूर्ती हॉल गोविंद सुपर मार्केट येथे आयोजित करण्यात आला आहे. विद्यार्थी व समाज बांधव यांचा सत्कार करण्यात आहे. सन २०२२ च्या दहावी परीक्षेत ९० टक्के व त्यापेक्षा जास्त तसेच बारावी परीक्षेत ८० टक्के व त्यापेक्षा जास्त, पदवी व पदव्युत्तर परीक्षेत प्रथम श्रेणी प्राप्त केले विद्यार्थी व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी यांच्या सत्कार करण्यात येणार आहे. अशा विद्यार्थ्यांनी आपल्या गुण पत्रिकेची प्रत जिल्हा सचिव यांच्याकडे पाठवायची आहे. तसेच आर्थिक मदतीसाठी अर्ज तालुका मंडळामार्फत १५ जुलै पूर्वी पाठवावे असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी चंद्रकांत तेली, लक्ष्मण तेली यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.