You are currently viewing संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एसटी प्रशासनाने सुरू केलेली मालवाहतूक गाड्या बंद करायचे निवेदन लवकरच सर्व जिल्ह्यांमधील प्रादेशिक कार्यालयाकडे देणार – जे डी नाडकर्णी

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एसटी प्रशासनाने सुरू केलेली मालवाहतूक गाड्या बंद करायचे निवेदन लवकरच सर्व जिल्ह्यांमधील प्रादेशिक कार्यालयाकडे देणार – जे डी नाडकर्णी

सध्या सुरू असलेल्या एसटी महामंडळाच्या मालवाहतूक गाड्या या नियमा बाहेर सुरू असून त्याकडे प्रादेशिक अधिकाऱ्यांचे लक्ष वेधणार, कारण या सर्व गाड्या या एसटी महामंडळाने जुन्या बसेस च्या सीट काढून, फक्त बसेसची बॉडी, तशीच ठेवून कायद्याचे उल्लंघन करून त्या बसेसच्या क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक केली जात आहे, व त्यामुळे सदर वाहतूक करणाऱ्या चालकाचे जीव धोक्यात घातले जात आहे.
सदर बसेस या प्रवाशी वाहतूक करण्याच्या श्रमते नुसार पासिंग केल्या जात असे, पण सध्या त्या गाड्यांमध्ये दुपटीने मल भरला जात असून कधी कधी तर चालका बरोबर वाहक पण दिला जात नाही. ज्यामुळे भरलेले मालवाहतूक करणारा ट्रक हा चढती च्या वेळेस व घाटामध्ये चालवणे अत्यंत धोक्याचे झालेले आहे.
सदर मालवाहक म्हणून वापरण्यात आलेले संपूर्ण महाराष्ट्र मधील बसेस हे चुकीच्या पद्धतीने चालविले जात असून, प्रादेशिक अधिकाऱ्यांनी सदर बाब लक्षात घेऊन लवकरात लवकर हे संपूर्ण ट्रक बंद करण्याचे आदेश द्यावे.
एसटी प्रशासनाला जर अशा पद्धतीचे मालवाहतुकीसाठी ट्रक वापरायचे झाल्यास त्यांनी तसे नवीन ट्रक विकत घेऊन नियमात काम करावे.
कायद्यामध्ये व कायद्याप्रमाणे नियमा बाहेर असले मालवाहतूक करणारे ट्रक महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेला रस्त्यावर आढळल्यास त्यांना तिथेच थांबविण्यात येईल व ते ज्या आगारा मधील सदर अनधिकृतरित्या चालवलेले ट्रक असतील, त्या त्या आगरा मधील आगार व्यवस्थापकाला त्या कामाबद्दल दोषी मानले जाईल, असे नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 3 =