नवी दिल्ली:
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये कुठलाही बदल न करता मॉनेटरी पॉलिसी कमिटीनं रेपो रेट ४ टक्के तर रिव्हर्स रेपो रेट ३.३५ टक्क्यांवरच ठेवला आहे.
कोरोना संकटामुळे अर्थव्यवस्थेत घसरण झाली आहे. या घसरणीतून अर्थव्यवस्था सावरत आहे. चौथ्या तिमाहीत म्हणजे जानेवारी ते मार्च २०२१ या कालावधीत अर्थव्यवस्था पुन्हा मार्गावर येत असल्याचे स्पष्ट दिसू लागेल, असा विश्वास रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केला. ऑगस्ट महिन्यात देखील पॉलिसी रेट मध्ये कोणताही बदल करण्यात आला नव्हता. मात्र त्याआधी फेब्रुवारीमध्ये रेपो रेटमध्ये २.५० टक्के कपात करण्यात आली होती.
आरबीआयच्या पतधोरणानंतर शेअर बाजार वधारला आहे. आजपासून आरटीजीएस २४ तास सुरु राहणार असल्याची देखील माहिती आहे.
तिसऱ्या तिमाहीसाठी जाहीर झालेल्या टप्पयातील महत्वाची धोरणे
ऑक्टोबर ते डिसेंबर २०२० या तिमाहीसाठी रेपो रेट ४ टक्के आणि रिव्हर्स रेपो रेट ३.३५ टक्के असणार
कोरोना संकटाचा २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या जीडीपीवर परिणाम होणार, जीडीपीत ९.५ टक्क्यांची घट होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
घसरणीतून अर्थव्यवस्था सावरत आहे, जानेवारी ते मार्च २०२१ या कालावधीत अर्थव्यवस्था पुन्हा मार्गावर येऊ लागेल आहेत.
अर्थव्यवस्था सावरण्यासाठी रिझर्व्ह बँक उदार धोरण अवलंबिणार तर कोरोना संकटामुळे निर्माण झालेल्या मंदीशी अर्थव्यवस्थेची निर्णायक लढाई असणार
पहिल्या तिमाहीतील घसरण मागे टाकत अर्थव्यवस्था सावरत आहे तर रिझर्व्ह बँकेचा अर्थव्यवस्था सावरण्यावर भर चौथ्या तिमाहीत जीडीपी सावरल्याचे स्पष्ट दिसेल
आर्थिक व्यवहारांसाठी देशात पुरेशी रोख रक्कम उपलब्ध राहावी यासाठी रिझर्व्ह बँक पुढल्या आठवड्यात बाजारात २० हजार कोटी रुपये ओतणार
महागाई दरातील वाढ तात्पुरती, कृषी क्षेत्राची प्रगती उत्साहवर्धक, तेलाचे दर नियंत्रणात राहण्याची शक्यता आहे.
डिसेंबर २०२० पासून २४ तास आरटीजीएस सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव विचाराधीन, लवकरच निर्णयाची शक्यता दिसून येते.